तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा
मार्च२०२० मध्ये झालेल्या इ.१०वीच्या परीक्षेत मराठी विषयात ९१ गुणांपेक्षा जास्त गुण पडलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा आकर्षक ई प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र गोंधळी ( राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते ) आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष एम. एन. शिवणगेकर असणार आहेत. तरी तालुक्यातील मराठी अध्यापकांनी पाच सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता गुगल मीट अॅप द्वारे ऑनलाईन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन तालुका संघाचे उपाध्यक्ष बी.एन. पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment