राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चंदगड तालुक्यात दिड लाखांचा मुद्देमाल जप्त, कोठे झाली हि कारवाई? - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2020

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चंदगड तालुक्यात दिड लाखांचा मुद्देमाल जप्त, कोठे झाली हि कारवाई?

राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेली गोवा बनवाटीची दारु
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
       अनंत चतुंदर्शीच्या सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज विभागाने पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे टाकलेल्या छाप्यात गोवा बनावटीचा जवळपास दिड लाखाचा मद्यसाठा जप्त करूण अवैधरित्या मद्यसाठा बाळगल्याप्रकरणी प्रकाश जानबा गोरल यांच्यावर कारवाई करण्यात आली.
             राज्य उत्पादन शुल्क गडहिंंग्लज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार पाटणे फाटा येथे वास्तव्यास असणाऱ्या गोरल याच्या घरी गोवा बनावटीचा मद्यसाठा असल्याची माहीती मिळाली. दि. 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. गोवा बनावटीच्या मद्याचे 27 बॉक्स जप्त करण्यात आले.जवळपास दिड लाख रुपये किमतीचा मद्यसाठा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ही कारवाई निरीक्षक मिलींद एस गरूड याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए.बी.बाघमारे, टी.एन. गुरव, ए. एस. आय. ढोबंरे, आर.एन. कोळी, एन. एस. केरकर, ए. टी. थोरात, ए. आर. जाधव व पाटणे फाटा पोलिस चौकीचे हवालदार डी. एन. पाटील यांनी कारवाई केली.


No comments:

Post a Comment