हलकर्णी महाविद्यालय तर्फे निर्माल्य संकलन उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2020

हलकर्णी महाविद्यालय तर्फे निर्माल्य संकलन उपक्रम

हलकर्णी महाविद्यालय तर्फे राबविण्यात आलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमाला नागरीकांनी प्रतिसाद दिला.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
       हलकर्णी (ता. चंदगड ) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या  यशवंतराव चव्हाण महा विद्यालय  व गुरुवर्य विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णी  येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तडशिनहाळ येथे अनंतचतुर्थी दिवशी गणेश विसर्जन ठिकाणी निर्माल्य संकलन व प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आले.
       उपस्थितीत ग्रामस्थ यांचे समाज प्रबोधन करून निर्माल्य पाण्यात टाकू नये, असे आव्हाहन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रशस्त अधिकारी डॉ राजेश घोरपडे, डॉ चंद्रकांत पोतदार, डॉ चीदानंद तेली यांचे सह राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल गवळी यांचे प्रोत्साहन लाभले व  पुडंलीक दरेकर  उपस्थित सर्वांचे आभार मानले. 


No comments:

Post a Comment