रविद्र बांदिवडेकर |
चंदगड / प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नागनवाडी (ता. चंदगड) येथील उपसरपंच रविंद्र बांदिवडेकर यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र भाजपाचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी दिले. भारतीय जनता युवा मोर्चाचे संघटन वाढवून संघटन कौशल्याने तालुक्यात युवांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच जास्तीत जास्त युवांना युवा मोर्चामध्ये सामील करण्यासाठी सहकार्य करावे, संघटन कौशल्याने पक्षाचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत न्यावे, तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडून ते मार्गी लावावे, तरुणांना पक्षात अधिकाधिक संख्येने सहभागी करून घ्यावे, असे पत्रात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment