तालुका संघाचे माजी व्यवस्थापक बाळासाहेब कोकीतकर यांच्या निधनानिमित्त रविवारी शोकसभेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2020

तालुका संघाचे माजी व्यवस्थापक बाळासाहेब कोकीतकर यांच्या निधनानिमित्त रविवारी शोकसभेचे आयोजन

बाळासाहेब कोकीतकर

चंदगड / प्रतिनिधी 

          कुदनूर (ता. चंदगड) येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते, तालूका संघाचे माजी व्यवस्थापक, सिदेश्वर सेवा संस्थेचे अध्यक्ष, राजीव गांधी पतसंस्थेचे संस्थापक बाळासाहेब परशराम कोकितकर यांचे मंगळवारी निधन झाले. गावच्या विकासात महत्वपूर्ण योगदान असणारे कै.कोकीतकर यानी अनेकांना संकटकाळी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या अकस्मिक निधनाने सामाजिक, राजकिय क्षेत्राची हानी झाली आहे.त्यामुळे उद्या रविवार दि १८ रोजी सकाळी अकरा वाजता  सिदेश्वर सेवा सोसायटीच्या सभागृहात शोकसभेचे  आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच प्रा.सुखदेव शहापुरकर यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शोकसभेच्या वेळी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन प्रा. शहापुरकर यांनी केले आहे.No comments:

Post a Comment