अथर्व-दौलतच्या दुसऱ्या गळीत हंगामाचा सोमवारी शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2020

अथर्व-दौलतच्या दुसऱ्या गळीत हंगामाचा सोमवारी शुभारंभ

दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र

 दौलत हलकर्णी / प्रतिनिधी

      अथर्व इंटरट्रेड प्रा.लि.लिज्ड दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हलकर्णी (ता. चंदगड) चा दुसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार दि. १९ रोजी सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार असल्याची माहीती प्रशासकिय अधिकारी व्यंकटेश ज्योती यांनी दिली.

         बऱ्याच वर्षापासुन बंद पडलेल्या अथर्व-दौलतचा दुसरा गळीत हंगाम सर्वांच्या सहकार्याने सुरु करत आहे. कामगार वर्गाने चांगली साथ दिली. सर्व मशिनिरीची चाचणी घेतली आहे. त्यामुळे या वेळी जास्तीत-जास्त ऊस गाळप करण्याचे उध्दिष्ठ आहे. त्यासाठी शेतकरी वर्गाने देखील ऊस अथर्व-दौलतलाच पाठवावा असे आवाहन अथर्व-दौलतचे चेअरमन मानासिंग खोराटे यांनी केले आहे. 






No comments:

Post a Comment