थुंकी मुक्त महाराष्ट्र, गडहिंग्लज सारख्या जनप्रबोधनाची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2020

थुंकी मुक्त महाराष्ट्र, गडहिंग्लज सारख्या जनप्रबोधनाची गरज

 दसरा चौक गडहिंग्लज येथे थुंकीमुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी  नागरिकांचे प्रबोधन करताना कार्यकर्ते.


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

          सध्या जागतिक महामारीचे कारण ठरलेला कोरोनाव्हायरस  विशेषता थुंकी वाटे पसरतो हे सिद्ध झाले आहे. याला आळा घालण्यासाठी 'थुंकी मुक्त महाराष्ट्र' अभियान चालवले जात आहे. तथापि तंबाखूयुक्त महाराष्ट्र थुंकी मुक्त  होणे तसे महाकठीणच?  तरीही हे अभियान यशस्वी करण्यासाठी विविध संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते जिवाचे रान करत आहेत. पण ऐकतो कोण? अशा मानसिकतेतही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट दिसून येत आहे. सध्या रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कार्यवाही सुरू आहे. एकंदरीत प्रत्येकानेच मी सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही! असे निर्बंध स्वतःवर घालून घेणे गरजेचे आहे.

      हे अभियान यशस्वी करण्यासाठी आज गडहिंग्लज शहरातील दसरा चौकात सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्या नागरीकांना या सवयीपासून परावृत्त करण्यासाठी विविध उपक्रमांच्या द्वारे प्रबोधन केले. या उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला.  प्रबोधन उपक्रम राबवणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक प्रा. प्रकाश भोईटे, रमजानभाई आत्तार, अरविंद बारदेस्कर, बाळेशी नाईक, सुरेश दास, अजित चौथे, उर्मिला कदम, अनिता पाटील, रमेश कुलकर्णी, रावसाहेब पाटील, शालेन बारदेस्कर आदींसह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आजच्या स्थितीत अशा प्रकारचे जनप्रबोधन गावोगावी झाले पाहिजे.

No comments:

Post a Comment