शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची गरज - आत्मा संचालिका सुनंदा कुऱ्हाडे यांचे मत - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2020

शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची गरज - आत्मा संचालिका सुनंदा कुऱ्हाडे यांचे मत

मांडेदुर्ग येथे शिवमुद्रा शेतकरी गटातर्फ़े शेतकरी शास्त्रज्ञ संवाद

मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आत्माच्या संचालिका सुनंदा कुऱ्हाडे, बसलेले नंदकुमार कदम, किरण पाटील, पांडुरंग काळे आदी.

चंदगड / प्रतिनिधी 

       शेतातील उत्पादनाच्या  खर्च वाढल्याने शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीने  शेती करणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धतीने चालत आलेली स्थिती चुकीची पाणी देण्याची पद्धत  व तीच तिच बियाणे यामुळे जमिनीचा पोत कमी झाला आहे. उत्पन्नात घट आली आहे.  त्यामुळे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची गरज आहे. यासाठी गट शेती संकल्पनेतून उन्नत्ती करण्याची गरज आहे. त्याचं बरोबर पारंपरिक शेतीला फाटा देऊन सेंद्रीय शेती करण्याची गरज आहे. शेतीकडे शेती म्हणून न पाहता एक व्यवसाय म्हणून पाहिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल होण्यास हरकत नाही असे प्रतिपादन कोल्हापूर आत्मा च्या संचालिका सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले. त्या मांडेदुर्ग येथील शिवमुद्रा शेतकरी गटातर्फ़े आयोजित शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद, प्रक्षेत्र भेट व कृषी दिन कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी गटामार्फ़त इंद्रायणी भाताचे वाण दिलेल्या शेतकऱ्यांच्या भात शेतीला भेट देण्यात आली.

         प्रास्ताविक शेतकरी गट अध्यक्ष गणपत पवार यांनी केले. व शिवमुद्रा शेतकरी गटामार्फत या परिसरात राबवण्यात येत असलेल्या विविध कामांची माहिती दिली. सुनंदा कुऱ्हाडे पुढे म्हणाल्या, शासनाने शेतकऱ्यांना कृषी उन्नती साठी विविध योजना आणल्या आहेत. स्मार्ट योजनांचा लाभ करून घ्या.असे सांगून सेेंद्रीय शेतीला प्राधान्य द्या असे मत व्यक्त केले.

      यावेळी उप विभागीय कृषी अधिकारी नंदकुमार कदम म्हणाले, शेतीमध्ये आज खूप बदल झाला आहे. शासनाने शेती व्यवसायाला खूप प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध योजनांची माहिती करून घेण्याची गरज आहे.आपल्या आजूबाजूला विविध औषधांची ,खतांची बनावटी उत्पादने विक्रीसाठी येत आहेत त्यामुळे सावधानता बाळगली पाहिजे योग्य मार्गदर्शन घेऊन ती वापरली पाहिजे  असे आवाहन केले. 

    यावेळी कृषी विज्ञान केंद्र कनेरी मठाचे कृषी तज्ञ पांडुरंग काळे म्हणाले, शेतकऱ्यांनी शेतामध्ये जास्त कालावधीची पिके न घेता कमी कालावधीची व ज्यादा उत्पादन देणारी पिके घ्यावी.जमिनीचा पोत वाढवण्यासाठी शेंद्रीय व जैविक औषधांचा वापर करावा. पाचट, शेणखत, जीवामृत यांचा वापर करावा व शेतीत नवनवीन प्रयोग करावे, योग्य मारग्दर्शन घ्यावे असे सांगितले.

         यावेळी चंदगड कृषी अधिकारी किरण पाटील यांनी काजू पिकावर विमा संदर्भात शेतकऱ्यांना आहवान केले व कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती घ्यावी असे सांगितले. निवृत्ती हारकरे यांनी या परिसरात कृषी विभागा संदर्भातील येत असलेल्या अडचणी मांडल्या. या कार्यक्रमासाठी तालुका तंत्र व्यवस्थापक अभिजित दावणे यांनी परिश्रम घेतले.

    यावेळी अक्षय गावडे, ए. एस. चव्हाण, विनोद टक्केकर, संदीप पाटील, स्वप्नील पाटील, राजू नौकुडकर, निंगाप्पा पाटील, रवींद्र टक्केकर, एम एम पाटील, भावकु गुरव, भरमु पाटील, म्हातारु कागणकर, शिवाजी पाटील, संदीप पाटील, विलास कागणकर, सुमित्रा चोथे, पूजा पवार, अनिता धमणेकर,यमुना खराडे, पूजा पाटील, भारता शिंदे दिपाली पाटील मधुरा पाटील आदी सह शेतकरी उपस्थित होते. सुत्रसंचालन दयानंद पाटील यांनी केले. आभार नाना डसके यांनी मानले.

No comments:

Post a Comment