![]() |
कोवाड (ता. चंदगड) येथील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देताना मान्यवर. |
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
मैत्रांगण संस्थेकडून महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी कॅन्सरमुक्त अभियान कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड (ता. चंदगड) येथे राबवण्यात आला. यावेळी मैत्रांगण संस्थेच्या अध्यक्षा अनिता पाटील यांनी आरोग्य विभागातील नर्स, आशा वर्कर्ससह कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कोरोना काळात अविरत सेवा बजावणाऱ्या येथील डॉक्टर, नर्स, यांच्याबरोबरच कोवाड पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना संस्थेकडून कोरोना योद्धा सन्मानपत्रक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यांत आल्याने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या महिला कर्मचारी यांची गैरसोय होऊ नये म्हणून टेक्नोड्रिम्स क्रिएशन प्रा. लिमिटेड या कंपनीने महिला पोलीस कर्मचारी, नर्स, महिला डॉक्टर व महिला सफाई कामगार यांना टेक्नोएंंजल सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप केले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड चे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न चौगुले, आर. एस. साळुंखे, एस. व्ही. नाईक, एस. आर. पाटील, यु. एस. बरबान, वंदना वांद्रे, सरीता पाटील, मंगल तरवाळ इ. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांबरोबरच कोवाड पोलीस स्टेशनचे एआयएस हणमंत नाईक, पोलीस शिपाई मानसिंग चव्हाण, खुशाल शिंदे, अमर सायेकर व मुनिर मुल्ला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment