कोजागिरी काव्यधारा कार्यक्रमाचे ३० ऑक्टोबरला आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2020

कोजागिरी काव्यधारा कार्यक्रमाचे ३० ऑक्टोबरला आयोजन

तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा 

    साहित्यरत्नं चंदगड यांच्याकडून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ३० ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ठिक ४.०० वाजता `कोजागिरीचा क्षण अन् शब्दांचे धन` या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदानंद पुंडपाळ असतीलत. विलास माळी (गडहिंग्लज) प्रमुख वक्ते असतील. 

  कार्यक्रमाला विजयकुमार दळवी, सुनिल कोंडुसकर, नारायण गडकरी, नंदकुमार ढेरे, संजय पाटील, विलास कागणकर, लक्ष्मण व्हन्याळकर, बाबासाहेब मुल्ला, हर्षवर्धन कोळसेकर, पी. ए. पाटील, संतोष सावंत-भोसले असणार आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवी प्रमोद चांदेकर करतील.  प्रास्ताविक बी. एन. पाटील व आभार संजय साबळे मानतील. या कार्यक्रमाचा लाभ गुगलमीट लिंकः https://meet.google.com/pej-ggkt-grd  यावर घेता येणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण सुभाष बेळगांवकर, के. जे. पाटील, राजेंद्र वणगेकर (बी. न्युज), जयंवत जाधव, रवि पाटील, राहूल नौकुडकर, चंद्रकांत कोकितकर, संजय पाटील, हणमंत पाटील, कार्तिक पाटील, कमलेश जाधव (आदर्श बेकरी), राहुल गवस, जोतिबा गुरव आणि साहित्य रत्नं परिवार यांनी दिले असून दिलेल्या लिंकवर क्लिक करून १० मिनिटे आधी गुगलमिट लिंक द्वारे कवी संमेलनात  सहभागी होऊन काव्यानंद लुटण्याचे आवाहन साहित्य रत्न चंदगड परिवाराने केले आहे.



No comments:

Post a Comment