लाच घेणे गुन्हा तर लाच देणे महागुन्हा - डाॅ. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2020

लाच घेणे गुन्हा तर लाच देणे महागुन्हा - डाॅ. पाटील

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात शपथ घेताना विद्यार्थ्यी व कर्मचारी.

चंदगड / प्रतिनिधी

        र.भा माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने केंद्रीय सतर्कता आयोग आयोजित 27 ऑक्टो ते 2 नोव्हेंबर, 2020 या "दक्षता जनजागृती सप्ताह" निमित्त महाविद्यालयाचा सर्व स्टाफ व स्वयंसेवकांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची सामुहिक शपथ घेतली. 

शपथ प्रसंगी उपस्थित प्राचार्य डाॅ. पी. आर. पाटील, एन. एस. पाटील व इतर. 

        याप्रसंगी प्रथम डाॅ. एन. के. पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या व प्रा. एस. डी. गावडे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या संदेशाचं वाचन केले. NSS प्रकल्प अधिकारी प्रा संजय एन. पाटील यांनी सर्वांना शपथ दिली.  

        देशामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, असे एकही क्षेत्र शिल्लक राहिले नाही की जे भ्रष्टाचारमुक्त आहे. याची पाळेमुळे आज खोलवर रूजली आहेत. सहजासहजी याचे उच्चाटन करने असंभव आहे. त्यामुळे आपल्यासारख्या सुजान व शिक्षित नागरिकांनीच याच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केला पाहिजे. भ्रष्टाचार मग तो पैशाचा असो वा अन्य कोणत्याही गोष्टीचा हा माणसाला लाचार बनवितो. क्षणिक आनंदासाठी विकला जाणारा भ्रष्ट माणूस कधीच समाधानी नसतो. आपण या समाजाचे देने लागतो याचे भान ठेवून सर्वांनी यापुढे भ्रष्टाचार निर्मूलनाला हातभार लावावा असे मत प्राचार्य डाॅ. पी. आर. पाटील यांनी अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले. 

        प्रा. संजय पाटील म्हणाले की लाच घेणारा दोषी आहेच पण लाच देणारा तर महादोषी आहे. कारण आपण देतो म्हणूनच तर घेणा-याचे फावते, एकप्रकारे आपणच त्यांना प्रोत्साहन देत आहोत. कुठेतरी हे थांबले पाहिजे आणि त्यासाठीच आपण सर्वांनी मिळून अशी शपथ घेवूया की मी लाच देणारा नाही, मी लाच घेणार नाही, मी माझे कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणे व जनहितार्थ  सेवाभावी वृत्तीने पार पाडून आत्मनिर्भर भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यास मदत करेन. सतर्क भारत समृद्ध भारत हे ध्येय सर्वांनी मनी बाळगून वाटचाल करावी हीच अपेक्षा. यावेळी महाविद्यालयाचा सर्व स्टाफ व स्वयंसेवक उपस्थित होते. प्रा. व्हि. के. गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



No comments:

Post a Comment