मजरे कार्वे येथे राधाकृष्ण ट्रेडिंग कॉर्पोरेशन चे उद्घाटन करताना हभप गुरुवर्य भाऊसाहेब पाटील व इतर.
कार्वे / प्रतिनिधी-
मजरे कार्वे येथे राधाकृष्ण ट्रेडिंग कॉर्पोरेशन या पाईप्स, फिटिंग्जस,प्लम्बिंग व बाथरूम च्या साहित्याच्या विक्री केंद्राचे उद्घाटन झाले. बेळगाव वारकरी महासंघाचे अध्यक्ष ह भ प गुरुवर्य भाऊसाहेब महाराज पाटील यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कार्वेचे उपसरपंच, दै तरुण भारतचे पत्रकार निवृत्ती हारकारे यांनी सुरू केलेल्या या शोरूमचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून व फित कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी निवृत्ती हारकारे यांनी शोरूममधील सर्व साहित्याची माहिती दिली. चंदगड तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना उत्कृष्ठ सेवा देण्यात येईल. सर्व ब्रँडेड कंपन्यांचे साहित्य विक्रीसाठी असल्याने कुणाचीही फसवणूक होणार नाही. अधिकृत विक्रेता असल्याने होलसेल दरात साहित्य देऊन जनतेची सेवा करण्याचा संकल्प आहे.असे विचार मांडले. गुरुवर्य भाऊसाहेब पाटील यांनी या कुटुंबाने जनतेची सेवा करण्याचं व्रत घेतलं आहे.
नफ्याच्या पाठीमागे न लागता तालुक्यातील जनतेची जास्तीत जास्त सेवा करावी असे आशीर्वाद दिले.यावेळी गोकुळ दूध संघाचे जेष्ठ संचालक दिपकदादा पाटील, मजरे कार्वेचे सरपंच शिवाजी तुपारे, तालुका संघाचे संचालक तानाजी गडकरी, एम एम तुपारे, देवापा बोकडे, एस आर पाटील, पांडुरंग बेनके, दिलीप परीट,ह भ प बाळू भक्तीकर,हभप विश्वनाथ पाटील,हभप संभाजी पाटील,हभप यलापा पाटील,हभप सखाराम पवार, हभप महेश सदावर, हभप गणपती भोसले, हभप मनोहर गावडे, हभप जाणबा घोळसे, हभप रवळू कणबरकर, हभप जोतिबा मोरे, हभप तुकाराम शिंदे, इंजी. संदीप पाटील आदी उपस्थित होते.आभार अशोक हारकारे यांनी मानले.
No comments:
Post a Comment