दौलत-अथर्वचा पहिला हप्ता 2800रू देणार- संचालक पृथ्वीराज खोराटे - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2020

दौलत-अथर्वचा पहिला हप्ता 2800रू देणार- संचालक पृथ्वीराज खोराटे

दौलतचे संग्रहित छायाचित्र

दौलत हलकर्णी / प्रतिनिधी

         अथर्व इंटरट्रेड प्रा.लि.लिज्ड दौलत सहकारी साखर कारखाना लि. हलकर्णी (ता. चंदगड) चा दुसरा गळीत हगांम मोठ्या जोमाने सुरु आहे. गेल्या वर्षी बंद असलेला दौलत कारखाना सुरु करण्यासाठी चंदगड तालुक्यातील शेतकरी, नागरीकांनी भरपुर सहकार्य केले आहे. त्यामुळे निश्चितच गतवर्षीपेक्षा ऊसाला चांगला  दर देणे गरजेचे आहे. एफआरपी प्रतिटन 2760 रु. असून देखिल पहिला हप्ता 2800 रु. प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची माहीती संचालक पृथ्वीराज खोराटे यांनी दिली. त्याचबरोबर गतवर्षीप्रमाणे वाढीव दुसरा हप्ता देखिल देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पृथ्वीराज खोराटे यांनी सांगून  सहा लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्धिष्ठ नक्कीच गाठु असा विश्वास व्यक्त केला, तर गळीत हगांम चालु झाल्यापासून पधंरा दिवसामध्ये पन्नास हजार टन ऊस गाळप झाल्याची माहीती युनिट हेड धनजंय जगताप व मुख्य शेती अधिकारी युवराज पाटिल, उपमुख्य शेती अधिकारी भुषण देसाई उपस्थित होते.

No comments:

Post a Comment