म्हाळेवाडी येथील किल्ला सजावट स्पर्धेत दिगंबर पाटील प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2020

म्हाळेवाडी येथील किल्ला सजावट स्पर्धेत दिगंबर पाटील प्रथम

म्हाळेवाडी येथील किल्ला स्पर्धेत बक्षिस वितरण करताना मान्यवर व विजेते.

तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा

          म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे  घेण्यात आलेल्या किल्ला सजावट स्पर्धेत दिगंबर संजय पाटील व सहकारी यानी प्रथम क्रमांक पटकावला. दिगंबर ने  सिधुदुर्ग हा किल्ला केला होता तर दुसरा क्रमांक अनुष्का निगांपा दळवी व सहकारी  यानी तर तिसरा क्रमांक श्रीराम मायापा पाटील याने मिळवला .  चौथा क्रमांक तेजस महादेव पाटील व सहकारी पाचवा क्रमांक आर्यन सुनील कांबळे  यांनी  मिळवले तर बाकि किल्ला स्पर्धकांना उतेजनाथ क्रमांक मिळवले.  या किल्ला सजावट स्पर्धेचे परीक्षण सुनील कांबळे, दयानंद पाटील, मायापा पाटील यांनी केले तर कोवीड काळात गावात केलेल्या कामगिरी बद्दल कोवीड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment