पदवीधर व शिक्षक मतदानासाठी 5 नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदवावे – तहसिलदार विनोद रणवरे - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2020

पदवीधर व शिक्षक मतदानासाठी 5 नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदवावे – तहसिलदार विनोद रणवरे

चंदगड / प्रतिनिधी

     महाराष्ट्र राज्य विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम उपमुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी २ नोव्हेंबर २०२० रोजी जाहीर केला. चंदगड तालुक्यातील ज्या पदवीधर व शिक्षकांना मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करायचे आहे. त्यांनी ५ नोव्हेंबर २०२०२ अखेर योग्य त्या कागदपत्रासह चंदगड तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत फॉर्म जमा करावयाचे आहेत.

     पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना १८ नंबरचा फॉर्म, सोबत पदवी प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड / मतदान कार्ड  किंवा पॅनकार्ड जमा करावे. तसेच शिक्षक मतदारसंघांमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना १९ नंबरचा फॉर्म संस्थेच्या सही शिक्क्यानिशी, तसेच रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड / मतदान कार्ड  किंवा पॅन कार्डच्या प्रतिसह ५ नोव्हेंबर २०२० अखेर भरून जमा करायचा आहे. पदवीधर हा ऑक्टोबर २०१६ पूर्वी पदवी धारण केलेला असला पाहिजे. चंदगड तालुक्यातील पात्र व्यक्तीनी ५ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळपर्यंत फॅर्म जमा करावेत असे आवाहन तहसिलदार विनोद रणवरे यांनी केले आहे. 
1 comment:

Sambhaji Patil said...

Kas nav nondvaych link aahe ka 9987255129

Post a Comment