कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली कालकुंद्री बेळगाव कालकुंद्री चंदगड आगाराची बस कालपासून पूर्ववत सुरू झाल्यामुळे ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
![]() |
कालकुंद्री बेळगाव कालकुंद्री चंदगड आगाराची बस सुरु झाली. त्याप्रसंगी ग्रामस्थ. |
ही बस रोज दुपारी साडेबारा वाजता चंदगड वरून कडलगे मार्गे कालकुंद्री येऊन दोन वाजता बेळगाव, तिथून तीन वाजता कालकुंद्री, परत पाच वाजता बेळगाव व सव्वा सहा वाजता पुन्हा कालकुंद्री मुक्कामी येते. प्रवाशांच्या मागणीनुसार आगार व्यवस्थापक जी के गाढवे, वाहतूक नियंत्रक आयुब मुल्ला आदींच्या सहकार्यामुळे पुन्हा सुरू झाली आहे. या मार्गावरील सर्व प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आगारा मार्फत करण्यात आले आहे. काल कालकुंद्री ग्रामस्थांच्यावतीने बस चालक परसू नाईक व विलास पाटील, वाहक रवींद्र गाडीवडर यांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. यावेळी श्रीकांत पाटील, नारायण पाटील, अनंत पाटील, शिवाजी उप्पार, गावडू पाटील, लक्ष्मण मुतकेकर, विलास तेऊरवाडकर, अनिल तेऊरवाडकर आदींची उपस्थिती होती.
चंदगड आगार मार्फत गेल्या चार दिवसात सकाळी ७.४५ वा. चंदगड- परेल, ९.१५ वाजता निगडी, दुपारी २.३० वा. सांगली. याशिवाय पारगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी कोल्हापूर हून रोज सकाळी ५.४५ वाजता सुटणारी बस दहा वाजता पारगडला पोहोचेल. ही बस चंदगड ला जाऊन दुपारी २.३० वा. चंदगड हून सुटून चार वाजता पारगड ते कोल्हापूर मुक्कामी जाईल. सर्व गाड्यांना जुन्या तिकीट दराप्रमाणे आकारणी असून अपंग, ज्येष्ठ नागरिक आदी सवलती पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. बस सेवांसह एसटी चे मालवाहतूक ट्रकही उपलब्ध आहेत. सर्व सेवांचा लाभ घेऊन एसटी ला सहकार्य करावे असे आवाहन आगारप्रमुख जी के गाढवे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment