कलिवडे येथे महादेव पाटील यांच्या ऊसाच्या मळ्यात उच्चदाब विद्युत तार पडल्याने तीन एकर ऊसाला आग, साडेतीन लाखांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2020

कलिवडे येथे महादेव पाटील यांच्या ऊसाच्या मळ्यात उच्चदाब विद्युत तार पडल्याने तीन एकर ऊसाला आग, साडेतीन लाखांचे नुकसान

विद्युत बोर्डाने नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्याची मागणी

कलिवडे (ता. चंदगड) येथील महादेव पाटील यांचा जळून खाक झालेला ऊस.

दौलत हलकर्णी / प्रतिनिधी

       कलिवडे (ता. चंदगड ) येथील प्रगतशील शेतकरी महादेव जोतिबा पाटील यांचा गावाशेजारी असणारा रामघाट रस्त्याच्या शेजारी वन्य खात्याच्या हद्दीला लागून व कलिवडे बसस्टॉप जवळील बागेतील सर्वे नं. १०४ व १०५ शेतातील  ऊसाच्या मळ्याला आज  दि.४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजता उच्चदाब विद्युत तार पडून आग लागून  लाखोंचे नुकसान झाले. 

     विद्युत महामंडळाची  या ऊसाच्या मळ्यातून काळानंदी गडावर विद्युत पुरवठा करणारी अनेक वर्षापूर्वीच्या जुनीजिर्ण विद्युत तारा गेल्या होत्या.आज अचानक उच्चदाबाची एक तार तुटून ऊसात पडल्याने ऊसाला आग लागली. नऊ एकर ऊसाच्या मळ्यातील तीन एकर जोमाने  हातातोंडांशी आलेले शेतकऱ्यांचे आर्थिक कणा असणाऱ्या या पीकाचे नुकसान केवळ इलेक्ट्रीक बोर्डाच्या विद्युत तार पडल्याने झाली आहे.

       गडावर विद्युत पुरवठा करणारी ही उच्च दाबाची तारा जुन्याजीर्ण झाल्याने दरवर्षी तुटत असतात. यावर्षी पावसाळ्यात ही तार तुटून पडली होती. पण त्या वेळी धोका टळला. अचानक ही जुनी जीर्ण झालेली तारा शेतातून व वन्य परिसरात पडण्याची शकता असून यामुळे वन्यप्राण्यासह मनुष्यांनाही धोका निर्माण होवू शकतो.यापुढे तरी अशा घटना घडू नये म्हणून विद्युत महामंडळानी उपाययोजना करावी. सदरहू घडलेल्या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून झालेल्या या  साडे तीन लाखाची नुकसान भरपाई त्वरीत द्यावी अशी या शेतकऱ्याची मागणी आहे.





No comments:

Post a Comment