तूर्केवाडी येथील ब्रम्हलिंग देवालयाच्या जिर्णोध्दारासाठी एक लाखाची मदत, पाटणे येथील गोपाळ वणकूंद्रे यांची साामाजिक बांधिलकी - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2020

तूर्केवाडी येथील ब्रम्हलिंग देवालयाच्या जिर्णोध्दारासाठी एक लाखाची मदत, पाटणे येथील गोपाळ वणकूंद्रे यांची साामाजिक बांधिलकी

तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील दैवालयाच्या जिर्णोध्दारासाठी गोपाळ वणकुंद्रे यांनी लाखाची मदत केली. यावेळी उपस्थित मान्यवर. 

          चंदगड / प्रतिनिधी

         तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील  श्री ब्रम्हलिंग मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी पाटणे ता चंदगड येथील गोपाळ गोविंद वणकुंद्रे यांनी एक लाख रुपये देणगी देत सढळ हस्ते मदत केली आहे. यावेळी त्यांच्या पत्नी शीला गोविंद वणकुंद्रे, मुलगा धनेद्र गोविंद वणकुंद्रे, सार्थक, पारस तसेच ह.भ.प गोपाळ ओऊळकर, ज्येष्ठ वारकरी पुंडलिक सुतार, नारायण गावडे, तुकाराम कांबळे, मारुती ओऊळकर, शंकर नाईक, जयवंत कदम, तुकाराम निगो पाटिल तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. 

        तुर्केवाडी येथील श्री ब्राम्हलिंग मंदिर हे पूर्वीपासून पंचक्रोशीतील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. तसेच ते येथे आठवडी बाजारासाठी येणाऱ्या व्यावसायिकांचे एक व्यासपीठ होते. त्यामुळे या मंदिराशी या लोकांचे एक भावनिक नाते पूर्वीपासून जोडले गेले आहे. त्यातूनच पूर्वीपासून या मंदिरात बसून कासार व्यवसाय करणारे गोपाळ गोविंद वणकुंद्रे यांनी आपल्या व्यवसायात मोठी प्रगती केली. या भावनिक बंधातूनच त्याने स्वखुशीने सढळ हस्ते मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी आर्थिक मदत देऊ केली. यावेळी वणकुंद्रे यांनी तुर्केवाडी गाव व ब्रम्हलिंग मंदिराच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी त्यांनी व्यवसायातून गेली वीस वर्षे काटकसर करून जमा केलेली एक लाख रुपयांची रक्कम मंदिरातील दगडी हत्तीच्या पुतळ्यासाठी मदत स्वरूपात गोपाळ ओऊळकर यांच्याकडे सुपूर्द केली.




No comments:

Post a Comment