चंदगड तालुक्यात भात, नाचना खरेदी केंद्र सूरू करा, स्वाभिमानीची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2020

चंदगड तालुक्यात भात, नाचना खरेदी केंद्र सूरू करा, स्वाभिमानीची मागणी

चंदगड तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी स्वाभीमानीच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

       चंदगड / प्रतिनिधी 

        चंदगड तालुक्यामध्ये भात पिकाची सूगी सुरू असून काही दिवसात नाचणी पिकाची मळणी देखील चालू होणार आहे. त्यामूळे शासनाने भात नाचना खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी स्वाभिमानी  शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच काही शेतकऱ्यांची मागील २०१८-१९ सालची नुकसान भरपाई मिळालेली नाही, ती देखील त्वरित द्यावी असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

        व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी शासनाने ठरविलेला हमीभाव द्यावा यासाठी शासनाने खरेदी केंद्र  सुरू करावी. व शासनाच्या दरानुसार भाताला प्रति क्विंटल १८८८ रुपये, नाचण्याला प्रति क्विंटल ३२२५ रुपये असा हमीभाव द्यावा.तसेच चंदगड तालुक्यात कुदनूर, कोवाड, यशवंतनगर, तुडये, नागणवडी, अडकुर व चंदगड येथे खरेदी केंद्रे सूरू करून भात व नाचना आदी पिके खरेदी करावीत व शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनातून केली आहे. तसेच शासनाने हमीभाव देऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासामध्ये हातभार लाऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.             

           या निवेदनावर जिल्हा कार्यकारिणी सदस्य  बाळाराम फडके,तालूका प्रमूख शशिकांत रेडेकर, शिवाजी भोगण, दत्तू बेळगावकर, रामचंद्र बसरीकट्टी, मधुकर पाटील, रवींद्र पाटील, सतीश सबनीस, सुरेश कुट्रे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.



No comments:

Post a Comment