ऑनलाईन वृत्तसेवा
आयपीएल स्पर्धेची भारतामध्ये मोठी क्रेझ आहे. गेले दिड महिन्यापासून सुरु असलेल्या या आयपीएलमध्ये पाँईट टेबलमध्ये टॉपवर असलेली मुंबई इंडियन्सची टीम आयपीएलच्या फायनल मॅचमध्येही नंबर वन ठरली. त्यांनी आज झालेल्या अंतिम सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटलचा पाच गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्स हि पाचव्यांदा आयपीएल जिंकणारी पहिली टीम बनली असून आयपीएल स्पर्धेमध्ये आजच्या मुंबईच्या विजयामुळे इतिहास घडवला आहे.
आजच्या सामान्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत १५६ धावांचे लक्ष ठेवले होते. मुंबई इंडियन्सचे सुरवातीपासून आक्रमक खेळ करत ५ विकेटनी दिल्लीवर विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावावर केले. मुंबई इंडियन्सचे कप्तान रोहीत शर्माची खेळी लक्षवेधी ठरली. रोहीत शर्माने ५१ बॉलमध्ये ६८ धावा केल्या. कुणाल पंड्याने विजयी धाव घेतली. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष साजरा केला. मुंबई इंडियन्स नंतर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल फायनल तीन वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. मुंबईसारखी कामगिरी अन्य कोणत्याही संघाला आतापर्यंत केली नाही. मुंबई इंडियन्स संघ जिंकल्यानंतर चंदगड शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला.
२०१३ -
चेन्नई सुपर किंग्ज (२३ धावांनी विजय)
२०१५ - चेन्नई सुपर
किंग्ज (४१ धावांनी विजय)
२०१७ - रायझिंग पुणे
(१ धावेने निसटता विजय)
२०१९ - चेन्नई सुपर
किंग्ज (१ धावेने विजय)
२०२० - दिल्ली
कॅपिटल्स (५ विकेटनी विजय)
आयपीएलच्या
सुरवातीपासून आयपीएलचे विजेते व उपविजेते
वर्ष
विजेता संघ उपविजेता संघ
२००८ राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपर किंग्स
२००९ डेक्कन चार्जर्स
हैद्राबाद रॉयल्स चॅलेचर्स बेंगलोर
२०१० चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स
२०११ चेन्नई सुपर किंग्स रॉयल्स चॅलेचर्स बेंगलोर
२०१२ कोलकत्ता नाईट
रायडर्स चेन्नई सुपर किंग्स
२०१३ मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्स
२०१४ कोलकत्ता नाईट
रायडर्स किंग्ज इलेव्हन पंजाब
२०१५ मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्स
२०१६ सनरायझर्स हैद्राबाद रॉयल्स चॅलेचर्स बेंगलोर
२०१७ मुंबई इंडियन्स रायझिंग पुणे
२०१८ चेन्नई सुपर
किंग्स सनरायझर्स हैद्राबाद
२०१९ मुंबई इंडियन्स चेन्नई
सुपर किंग्स
२०२० मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपीटल्स
No comments:
Post a Comment