कोल्हापूर येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याची आमदार राजेश पाटील यांची खासदार संजय मंडलिकांकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

10 November 2020

कोल्हापूर येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याची आमदार राजेश पाटील यांची खासदार संजय मंडलिकांकडे मागणी

                            कोल्हापूर येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन खासदार संजय मंडलिक                              यांना देताना आमदार राजेश पाटील.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कोल्हापूर जिल्हयात एकही केंद्रीय विद्यालय नसल्याने अशा विद्यार्थी वर्गाला इतर जिल्हयात जावे लागत आहे. त्यामूळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कोल्हापूर येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याची मागणी चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यानी कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

      आमदार राजेश पाटील यानी निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, केंद्रीय विद्यालय ही भारतातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण प्रणाली आहे. जि. मुख्यत : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी डिझाईन केलेली आहे. सध्या भारतातल्या केंद्रीय विघालयांची संख्या 1225. इतकी आहे. तर परदेशात 3 केंद्रीय विद्यालये आहेत. ज्यामध्ये भारतीय दूतवासातील कर्मचाऱ्यांची व अनिवासी भारतीयांची मुले शिकत आहेत. विद्यार्थांच्या सर्वांगीन विकासासाठी केंद्रीय विद्यालये महत्वाची भूमिका बजावत आहेत. असे असले तरी कोल्हापूर जिल्हयात एकही केंद्रीय विद्यालय नाही. त्यामूळे विद्यार्थी वर्गाला शेजारच्या जिल्हयात जिल्हयातील केंद्रीय विद्यालयावर अवलंबून रहावे  लागत आहे . कोल्हापूर येथे केंद्रीय विद्यालयाला पोषक वातावरण आहे . शासनाने कोल्हापूर येथे दहा एकर जागा केंद्रीय विद्यालयासाठी उपलब्ध करुन दिल्यास अडचण निर्माण होणार नाही . येथील विद्यार्थी वर्गाला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी खासदार संजय मंडलिक केंद्रीय विद्यालयाच्या मंजूरीसाठी व जागेच्या उपलब्धतेसाठी  शासनाकडे प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार पाटील यानी निवेदनातून केली आहे.No comments:

Post a Comment