भारतीय संविधान जगासाठी आदर्श - प्राचार्य पी. आर. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2020

भारतीय संविधान जगासाठी आदर्श - प्राचार्य पी. आर. पाटील

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात आयोजित संविधान दिन कार्यक्रमावेळी उपस्थित प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यींनी. 

चंदगड / प्रतिनिधी

       घटनेने दिलेले हक्क व अधिकारांची पायमल्ली होऊ न देता प्रत्येक भारतीयाने संविधानाचा आदर करून  समाजात आपले स्थान भक्कम बनविले पाहिजे असे प्रतिपादन  प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले. ते माडखोलकर महाविद्यालय, चंदगड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित '26 नोव्हेंबर' या  संविधान दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 

        ते पुढे म्हणाले की, ``आपली घटना ही जगातील सर्वोत्तम मानली जाते. आम्ही भारताचे लोक या विधानातच 'मी' म्हणजे अहंकाराला थारा नाही. ही घटना आम्हाला समता, बांधुता, न्याय, एकतेची जाणीव करून देत आहे, त्यामुळे तिचा आदर करून सर्वांनी समाधानाचे जीवन जगावे, इतरांना जगू द्यावे.आज कांही भ्रष्ट लोकांकडून घटनेची पायमल्ली होत आहे यावर वेळीच पायबंद घातला गेला तरच आपण घेतलेली ही शपथ योग्य ठरेल, युवकांनी याचे भान ठेवावे.``          

           प्रारंभी प्रतिमा पूजन झाले. प्रकल्प अधिकारी प्रा. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले व  या दिनाचे महत्व विषद केले. प्रा. ए. डी. कांबळे यांनी उपस्थितांना संविधानाची शपथ दिली. आभार प्रा. एल. एन. गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व स्टाफ व स्वयंसेवक उपस्थित होते.



No comments:

Post a Comment