![]() |
डॉ. प्रशांत भापकर |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील क्वालिटी ॲनिमल फिड प्रायव्हेट लिमिटेड (बेलचीक) चे जनरल मॅनेजर डॉ. प्रशांत त्र्यंबकराव भापकर (वय 38) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
ते मुळचे बारामती जवळील लोणी-भापकर या गावचे रहिवासी असून गेली चार वर्षे ते बेलचीक कडे जनरल मॅनेजर म्हणून काम पाहत होते. ते सध्या बेळगाव येथे स्वामी विवेकानंदनगर, हरी मंदिर समोरील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. डॉ. सागर भापकर यांचे ते भाऊ होते.
No comments:
Post a Comment