केडीसीसी बँकेच्या शाखा सोमवारी सुरू राहणार, संचालक आ. राजेश पाटील यांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2020

केडीसीसी बँकेच्या शाखा सोमवारी सुरू राहणार, संचालक आ. राजेश पाटील यांची माहिती

 

राजेश पाटील

 कागणी : सी. एल. वृत्तसेवा

   कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक तथा केडीसीसी बँकेच्या चंदगड तालुक्यातील सर्व १३ शाखा सोमवारी दिनांक 16 रोजी दीपावली पाडव्या निमित्त  अन्य कामकाज वगळता केवळ ठेवी ठेवण्यासाठी सुरू राहणार असल्याची माहिती बँकेचे संचालक आम. राजेश पाटील व बँकेचे डीओ (विभागीय अधिकारी) जे. एच. कुंभार (माणगाव) यांनी दिली. दीपावलीच्या मुहूर्तावर केवळ ठेवी ठेण्यासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत बँकेचे कामकाज सुरू राहणार असून सभासदांनी आपल्या कामाची पूर्तता करावी, असे आमदार पाटील यांनी आवाहन केले आहे. बँकेने अलीकडेच सहा हजार कोटीं रुपये ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. तसेच बँकेचा संयुक्त व्यवसायही दहा हजार कोटींच्या पुढे गेलेला आहे. दिवसेंदिवस बँकेची विश्वासार्हता वाढत असून ठेवीदारांनी दिवाळीच्या मुहूर्तावर नजीकच्या शाखेत जाऊन ठेवी ठेवाव्यात, असे आवानही राजेश पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment