वाघोत्रे येथे चंदगड पोलिसांनी पकडली गोवा बनावटीची दारू, पाच लाख छत्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2020

वाघोत्रे येथे चंदगड पोलिसांनी पकडली गोवा बनावटीची दारू, पाच लाख छत्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त





चंदगड/प्रतिनिधी:--- वाघोत्रे ता.चंदगड येथील महादेव मंदिरासमोर चंदगड पोलिसांनी सापळा रचून तस्करी करण्यात येणारी गोवा बनावटीची दारू जप्त करून  पाच लाख छत्तीस हजार सोळा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.धोंडु सापसेट पास्ते (वय वर्षे  38 रा.सासोली ता.दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग)व अभिषेक प्रमोद ठोंबरे (वय वर्षे  20 रा.कळणे ता.दोडामार्ग जि.सिधुदुर्ग)या दोघांना चंदगड पोलिसांनी अटक केली आहे 
  चंदगड पोलिसांना खबर्या मार्फत  पारगड - वाघोत्रे - इसापुर मार्गे दाराची वाहतुक करणार  असल्याची माहिती मिळाली ,त्यानूसार  पोलीस उप निरीक्षक दिलीप पवार यानी फौजफाट्यासह सापळा रचला .
वाघोत्रे येथील कणवी मंदीराचे समोरून एक छोटा हत्ती गाडी नंबर  (GA-04,T-4002) भरधाव वेगाने येत असलेनची दिसली पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र वहान चालक पुढे गेला . त्यामुळे  त्यांचा संशय आलेने त्यांचे वाहन थांबवुन तपासणी केली असता गाडीत गोल्डन आईस व्हीस्की कंपनीचे 16 बॉक्स , एका बॉक्समध्ये 48 नग एक बॉटल 180 मिलीची , एका बॉटलची किंमत 112 रु प्रमाणे असा एकुण 5,36,016 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.गाडी चालक धोंडु सापसेट व अभिषेक प्रमोद ठोंबरे या दोघांना अटक करण्यात आली आहे.  ही दारू उमेश गोविंद आवडण रा.तुडीये ता.चंदगड यांचेसाठी घेऊन जात असल्याचे  या दोघांनी सांगितले. पोलिस निरीक्षक अविनाश माने याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार,  पोहेकाॅ अमोल देवकुळे , पो.काॅ दिरंबर गुरव , होमगार्ड  संभाजी फाटक , होमगार्ड  सुरज नाईक यांनी ही कारवाई केली.




No comments:

Post a Comment