अरुण लाड व जयंत आसगावकर पदवीधर व शिक्षकांच्या समस्या सोडवतील - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची चंदगडमध्ये मेळाव्यात ग्वाही - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2020

अरुण लाड व जयंत आसगावकर पदवीधर व शिक्षकांच्या समस्या सोडवतील - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची चंदगडमध्ये मेळाव्यात ग्वाही

 

      

चंदगड येथे विधान परिषदेच्या पुणे विभागातील पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे  उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात बोलताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ. यावेळी व्यासपीठावर आमदार राजेश पाटील, विजय देवणे, विद्याधर गुरबे, संग्रामसिंह कुपेकर व इतर प्रमुख.

चंदगड/प्रतिनिधी :--   अरुण लाड व जयंत आसगावकर हे दोघेही आमदार म्हणून पदवीधर आणि शिक्षकांच्या समस्या सोडवतील, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. हे दोन्हीही उमेदवार सामाजिक चळवळी आणि शैक्षणिक चळवळीशी संबंधित असल्याचेही श्री मुश्रीफ म्हणाले.

चंदगडमध्ये विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जयंत आसगावकर यांच्या  प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील होते.   

मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गेल्या दहा-बारा वर्षात पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न प्रलंबितच राहिले. पदवीधर आणि शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी श्री. लाड व श्री. आसगावकर याना पाठबळ द्या.

                  

ॲड. प्रकाश लाड म्हणाले, चांगल्या समाजनिर्मितीसाठी पदवीधर आणि शिक्षकांचे चांगले आमदार प्रतिनिधी असणे गरजेचे आहे.

        

आमदार राजेश पाटील म्हणाले, अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्या विजयासाठी चंदगड, गडहिग्लज विभागातून राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष हातात हात घालून संघटितपणे काम करू.   

        

यावेळी खेडूत खेडूत शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. आर. पी. पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव देवने, संग्रामसिंह कुपेकर, विद्याधर गुरबे यांचीही भाषणे झाली.

            

व्यासपीठावर नगराध्यक्षा सौ. प्राची कानेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील,  सौ. संज्योती मळवीकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई, प्रा. सुनील शिंत्रे, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, चंदगड अर्बन बँकेचे अध्यक्ष दयानंद काणेकर, चंदगड राष्ट्रवादीचे अध्यक्ष भिकू गावडे, बाळासाहेब पिळणकर, अशोक देसाई, राजू रेडेकर, सौ. संगीता पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

     स्वागत शिवानंद हुंबरवाडी यांनी केले. सूत्रसंचालन एम. के. पाटील यांनी केले.

त्यांना वेड लागायची पाळी आली.........*

मंत्री मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा विश्वासघात करायचा चंगच बांधला होता. आपलंच सरकार स्थापन होईल, अशा अविर्भावात असलेल्या भाजपचे १०५ आमदार येऊनही विरोधात बसावं लागल्यामुळे त्यांना वेड लागायची पाळी आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

No comments:

Post a Comment