शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर गुरूवारी सातवणे येथे चर्चासत्र - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2020

शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर गुरूवारी सातवणे येथे चर्चासत्र

 

फार्म फ्रेश फार्मर्स प्रोडूसर कंपनी लि. आणि तालुका कृषी विभाग चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

चंदगड/प्रतिनिधी :---  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे व विविध योजनांची माहिती देण्यासंदर्भात चंदगड फार्म फ्रेश फार्मर्स प्रोडूसर कंपनी लि. आणि तालुका कृषी विभाग चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शाहु महाराज शेतीमाल प्रक्रिया संस्था सातवणे, इनाम सावडे येथे गुरुवारी (दि. ३ डिसेंबर २०२० रोजी) सकाळी १० ते ४ या वेळेत हे चर्चासत्र होणार असून या कार्यक्रमात जिल्हा कृषी अधिक्षक ज्ञानदेव वाकुरे, आत्मा प्रकल्प संचालक सुनंदा कुऱ्हाडे, गडहिंग्लज उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार कदम, चंदगड तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या चर्चासत्रात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत प्रदीप गानू, शेती उत्पन्नाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची माहिती डॉ. परशराम पाटील, शेती कालची व आजची या विषयावर डॉ. नंदकुमार कदम, शासकीय योजनांची माहिती सुनंदा कुऱ्हाडे तर स्मार्ट योजनांची माहिती ज्ञानदेव वाकुरे देणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या चर्चासत्रात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment