देशव्यापी संपात कामगार संघटना कडून पंधरा मागण्यांचे निवेदन सादर - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2020

देशव्यापी संपात कामगार संघटना कडून पंधरा मागण्यांचे निवेदन सादर

चंदगड / प्रतिनिधी

       काल झालेल्या देशव्यापी संपात चंदगड तालुक्यातील विविध कामगार संघटनेच्यावतीने सहभाग घेऊन चंदगड तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
        कामगार विरोधी लेबर कोड त्वरित मागे घ्यावा सर्व कामगारांचे कायदे पुनर्स्थापित करा, शेतकरी विरोधी कायदा मागे घ्यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या सुत्रांनुसार उत्पादन खर्चाच्या दीड पट किमान आधारभूत किंमत देणारे कायदे करा, केंद्रीय सरकारचे प्रस्थावित व सुधारित वीज विधेयक २०२० त्वरित मागे चर्या, कोविड काळासाठी आयकर न भरणाऱ्या सर्व कुटुंबांना ७५००/- मासिक निर्वाह भत्ता द्या, सर्वांना पुढील सहा महिन्यांसाठी दर डोई १०किलो धान्य मोफत दर्या, रेल्वे, बी. पी. सी, एल, बंदरे, कोळसा व संरक्षण क्षेत्र, विमानतळे, बँका, विमा कंपन्यांचे खाजगीकरणं थांबवा, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करुन वन जमिनी कसण्या-यांच्या नावे करा, नियमित कामात असणा-या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामगार म्हणून मान्यता द्या, समान कामाला समान वेतन द्या, नवीन पेन्शन योजना रद्द करा, १९९५च्या इ. पी. एफ. योजनेत सुधारणा करून किमान पेन्शनची रक्कम दहा हजार रुपये करा,आशा, अंगणवाडी इत्यादी योजना कर्मचा-यांना नियमित करून त्यांना किमान वेतन,प्रोव्हिडंट फंडआणि पेन्शनचा लाभ द्या, रोजगार हमी योजना चा विस्तार करा.एका वर्षांत किमान २००दिवस काम व प्रतिदिन ६००रुपये रोज निश्चित करावा, शहरांमध्ये रोजगार हमी कायदा लागू करा, सार्वजनिक रेशन व्यवस्था मजबूत करा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करून प्रत्येक तालुक्यात दर्जेदार सार्वजनिक रुग्णालये उभारणी करा, सरकारी अनुदान देवुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करा,
        एस. टी. महामंळाचे संरक्षण करा व सरकारच्या अर्थसंकल्पाचा भाग बनला, बेस्ट मुंबई महापालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीन करा. या पंधरा मागण्यांचे निवेदन तहसिलदार चंदगड यांना देण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका अध्यक्ष माया शिवराम पाटील, कल्पना विश्वनाथ पिलारे, अस्मिता सुनिल शिंदे, पेपर मिल कामगार संघटनाचे जोतिबा जोशिलकर, आनंद भोसले, गिरणी कामगार गोपाळ गावडे, साखर कारखाना कामगार थांबा बोकडे, पायोनियर मिलचे एकनाथ नागुर्डेकर, नामदेव पाटील इत्यादी उपस्थित होते.


                    

No comments:

Post a Comment