![]() |
तेऊरवाडीतील किल्ला स्पधेंत प्रथम क्रमांक मिळवलेल्या ओमकार, मानव, वेदांत, साई याना पारितोषिक देताना मान्यवर. |
तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा
दिपावलीनिमित्य तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे आयोजित केलेल्या किल्ला बांधणी स्पधेंत जूना वाडा क्र. १ मध्ये ओमकार संजय पाटील व सहकारी यानी बांधलेल्या तोरणा किल्याचा प्रथम क्रमांक आला.
या स्पधेंचे आयोजन रामराव गुडाजी, अजय पाटील व शिवराज गुडाजी यानी केले होते. विजेत्या स्पर्धकाना तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश पाटील, भागोजी पाटील, रामराव गुडाजी आदिच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.
स्पधेंतील अन्य विजेते अनुक्रमे पुढीलप्रमाणे -द्वितिय- आदिती बुच्चे, तृतिय - श्रेयस कोकितकर, चतुर्थ- अतुल पाटील, पाचवा - मंचक पाटील, सहावा - सिताराम पाटील, सातवा - चेतन पाटील, उत्तेजनार्थ - पियांका पाटील, सान्वी गुडाजी.
यावेळी प्रमोद पाटील, गणेश पाटील, फ्रांन्सीस मंतेरो आदि मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment