नागरदळेच्या शिवाजी पाटील यांच्या काव्यसंग्रहाचे डोंबिवलीत होणार प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2020

नागरदळेच्या शिवाजी पाटील यांच्या काव्यसंग्रहाचे डोंबिवलीत होणार प्रकाशन

 

कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

       मुळचे नागरदळे (ता. चंदगड) व सध्या राहणार कोपरगाव, डोंबिवली(प), मुंबई येथील कवी शिवाजी वि. पाटील यांच्या  'माझी ती' या काव्यसंग्रहाचे दि. 16 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा होणार आहे.

      शिवाजी पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून महिंद्रा अँड महिंद्रा लि.या कंपनीत मेकॅनिक म्हणून काम करत आहेत. त्यांना लहापणापासुनच  साहित्य तसेच नाट्य कलेची मोठी आवड आहे. सध्या त्यांचे "माझी ती...", नागझरी व भावतरंग हे तीन काव्यसंग्रह तयार आहेत. यापैकी "माझी ती..." हा काव्यसंग्रहदि. १६ डिसेंबरला डोंबिवली येथे प्रकाशित होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला लेखक व प्राचार्य आदित्य अंकुश देसाई, कवी व पत्रकार सन्ना मोरे, महाराष्ट्र केसरी पुरस्कार विजेते पै. विष्णु जोशिलकर, किणीचे सुपुत्र व मुंबई येथील नाट्य लेखक, दिग्दर्शक जीवन कुंभार, कृष्णा बामणे, पत्रकार संदीप तारीहाळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.1 comment:

Unknown said...

Congratulations about your good work .

Post a Comment