शिक्षकांची कोविड टेस्टसाठी चंदगड सेंटरवर गर्दी, स्पष्ट आदेश नसल्याने गोंधळ - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2020

शिक्षकांची कोविड टेस्टसाठी चंदगड सेंटरवर गर्दी, स्पष्ट आदेश नसल्याने गोंधळ

चंदगड येथील कोविड सेंटरवर माध्यमिक  शिक्षकांची स्वॅबसाठी झालेली गर्दी.

तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा

प्रशासनाच्या सुचनेनुसार २३  नोव्हेंबर पासून इयत्ता ९ ते १२ पर्यंत शाळा सुरू होत आहेत . या अगोदर सर्व शिक्षकांची कोविड टेस्ट सक्तीची केली आहे . पण शिक्षकांच्या नावांची यादी व संख्येबाबत स्पष्ट आदेश नसल्याने चंदगड कोविड सेंटरवर गोंधळाचे वातावरण दिसून आले.

 दि .१९ ते २२ नोव्हेंबर पर्यंत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची कोविड चाचणी चंदगड कोविड सेंटरला करण्यात येत आहे . काल दि .१९ रोजी अडकूर , आमरोळी , इब्राहिमपूर, उमगाव , कानूर , चंदगड व 

आमरोळी येथील  १५ हायस्कूलमधील १०५ शिक्षकांची कोविड चाचणी करण्याचा आदेश होता . प्रत्यक्षात यापेक्षा अधिक जणांची कोविड टेस्ट घेण्यात आली . माध्यमिक शाळा मध्ये शिक्षक संख्या अधिक असतानाही टेस्टसाठी प्रशासनाकडून कमी संख्या देण्यात आली आहे . प्रत्यक्षात कोविड सेंटरवर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीही टेस्ट देत असल्याने गर्दी वाढून गोंधळ उडत आहे . याबरोबरच कोविड सेंटरवर शाळांच्या यादीनुसार की रांगेत उभारलेल्या नुसार स्वॅब घ्यायचा याबाबत कोविड सेंटरवर नियोजन न झाल्याने या गोंधळात भर पडली .

    आज दि .२० रोजी कालकुंद्री , कुदनुर व कोवाड केंद्रातील १०५, दि .२१ रोजी तुडये, दाटे , माणगाव व पार्ले येथील १५ माध्यमिक शाळातील १०५ व दि २२ रोजी कार्वे , मiडेदुर्ग, हलकर्णी , हेरे व मांडे दुर्ग परिसरातील १४ माध्यमिक शाळातील ११७ शिक्षकांची कोविड टेस्ट घेण्यात येणार आहे . प्रत्यक्षात कोविड सेंटरवर यापेक्षा अधिक संख्या स्वॅब साठी येत आहे . त्याबरोबरच  गरोदर स्त्रिया , बाहेरगावी नोकरीसाठी जाणाऱ्यांची गर्दी ही या केंद्रावर होत असल्याने येथील कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. 

No comments:

Post a Comment