पदवीधरांसाठी स्वतंत्र महामंडळ व बजेट साठी प्रयत्नशील - संग्राम देशमुख, चंदगड येथे पदवीधरांशी साधला संवाद - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2020

पदवीधरांसाठी स्वतंत्र महामंडळ व बजेट साठी प्रयत्नशील - संग्राम देशमुख, चंदगड येथे पदवीधरांशी साधला संवाद

चंदगड येथे प्रचार सभेत बोलताना पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष  समरजितसिंह घाटगे, गोपाळराव पाटील, भरमुआण्णा पाटील पाटील व इतर.

चंदगड / प्रतिनिधी

        पदवीधरांसाठी स्वतंत्र महामंडळ व बजेट साठी प्रयत्नशील राहीन.असे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी केले. चंदगड येथे भाजपा कार्यालयात झालेल्या पदवीधरांसाठी संवाद साधताना ते बोलत होते.

       ते पुढे म्हणाले, ``राज्यात भाजपचे किंवा अन्य कोणत्याही  पक्षाचे सरकार असूदे. आपण पदवीधरांच्या प्रश्नासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू. पदवीधरांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांच्यासाठी स्वतंत्र बजेट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू.

       भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, ``पुणे  पदवीधर मतदार संघात चंद्रकांतदादा पाटील, प्रकाश जावडेकर यांच्या सारख्या रथी-महारथी ने प्रतिनिधित्व केले आहे.  भाजपचा असलेला हा बालेकिल्ला अभेद्य राखूया .बिहार व इतर राज्यांतील पोट निवडणुकांमधील भाजपची विजयाची परंपरा सुद्धा कायम राखू या. असेही ते म्हणाले. यावेळी गोपाळराव पाटील, भरमूआण्णा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन मुगेरी, शांताराम पाटील, गोविंद पाटील, नामदेव पाटील, समृद्धी काणेकर, रवी बांदिवडेकर, राम पाटील, रत्नप्रभा देसाई आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment