दुर्गवीर प्रतिष्ठानककडून धनगर बांधवाना भेटवस्तु वाटप, धनगराकडून' गजापोवाचे सादरीकरण - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2020

दुर्गवीर प्रतिष्ठानककडून धनगर बांधवाना भेटवस्तु वाटप, धनगराकडून' गजापोवाचे सादरीकरण

दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संतोष हासुरकर भेटवस्तूंचे वाटप करताना.

तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा

    दुर्गवीर प्रतिष्ठान च्या माध्यमातून संतोष हासुरकर यानी तुडये (ता. चंदगड) येथील कामत वाड्यावर धनगर बंधूना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

      दुर्गवीर प्रतिष्ठान ने महाराष्ट्रातील केवळ गडकोट च नव्हे तर समाजातील वंचित घटकांपर्यंत नेहमीच मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. शिवछत्रपती च्या पद स्पर्शाने पवित्र झालेल्या ऐतिहासिक वास्तू, या महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा टिकवण्या साठी दुर्गवीर कडून सर्वतोपरी प्रयत्न चालूच आहेत. महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन  शिवरायानी स्वराज्याची घडी बांधली. स्वराज्यासाठी धनगर समाजाचं योगदान विसरून चालणार नाही. तुडये गावाच्या हाकेच्या अंतरावर वसलेल्या कामत वाड्यावर दुर्गवीराकडून या बांधवासाठी समाजपयोगी साहित्य दिवाळी ची भेट म्हणून देऊन आपली भावना व्यक्त केलीच पण त्याच बरोबर भविष्यात या बांधवाच्या अडीअडचणीत सोबत असल्याची ग्वाही सुद्धा  संतोष हासूरकर यानी दिली.दुर्गवीरची आपुलकी आणि प्रेम पाहून धनगर बांधवानी पाहुणचार म्हणून दसरा आणि दिवाळी सणात सादर केला जाणारा पारंपारिक "गजा पोवा "हा नृत्याविष्कार सादर करून सर्वच दुर्गवीर टीम चे आभार मानले.ग्रामीण आणि दुर्गम भागातील वंचित लोकांसाठी काही तरी करण्याची संधी दुर्गवीर च्या माध्यमातून संतोष दादा हासुरकर यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल  धनगर बांधवानी आभार मानले.

       यावेळी अभियंता रजत हुलजी, संदिप गावडे, अभिजीत अष्ठेकर, राजू सूतार, सतीश झाजरी, रोहित गुरव,  शुभम मोहिते, अजित पाटील, अजय सातार्डेकर, सागर मुतकेकर, संभाजी सावंत, पुंडलिक भांम्बर, उमेश बिजै आदि मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment