सरपंच संघटनेकडून गुडेवाडीचे कृषी शास्त्रज्ञ डाॅ. परशराम पाटील यांचा गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2020

सरपंच संघटनेकडून गुडेवाडीचे कृषी शास्त्रज्ञ डाॅ. परशराम पाटील यांचा गौरव

गुडेवाडी : डॉ. परशुराम पाटील यांचा गौरव करताना प्रा. रमेश भोसले, हेमलता भोसले, रामभाऊ पारसे व अन्य पदाधिकारी.
कागणी : संदीप तारीहाळकर

         गुडेवाडी (ता. चंदगड) गावचे सुपुत्र व भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग  मंत्रालयाचे सल्लागार,  कृषीशास्त्रज्ञ डॉ. परशराम पाटील यांच्या गुडेवाडी येथील घरी गुरुवार दि. 12 रोजी सायंकाळी सदिच्छा भेट देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या आई-वडिलांचा ही शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

         डॉ. पाटील यांनी सल्लागार पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते प्रथमच आपली जन्मभूमी गुडेवाडी (ता.  चंदगड) येथे आले आहेत. चंदगड तालुक्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातील डॉ. पाटील यांची कामगिरी कर्तुत्ववान अशी आहे.

           यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष व सातवनेचे सरपंच रामभाऊ पारसे म्हणाले, शेती ऊत्पादन, विक्री व भारतीय शेतकरी परंपरा, भविष्यात  येणाऱ्या अडचणी तसेच देशाचे कृषी विषयक बदलले धोरण याबाबत त्यांचा  मोठा अभ्यास आहे. ते याबाबत संशोधन करून सध्य स्थितीला आपल्या देशात कृषी विषयक बदलाबाबत महत्वपूर्ण कामगिरी करत आहेत. ही बाब आमच्या अभिमानाची गोष्ट आहे. सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. रमेश भोसले म्हणाले, चंदगड तालुक्यातील सामान्य शेतकरी व इतर उत्पादकांना फायदा होईल यासाठी सरपंच संघटनेतर्फे लवकरच त्यांचा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करू. 

       यावेळी सरपंच संघटनेचे कार्याध्यक्ष एकनाथ कांबळे, सहसचिव नरसिंगराव पाटील,सरपंच  संजय गावडे, ज्ञानेश्वर गावडे, महादेव पाटील, संस्कृती किरमटे, सम्रुद्धी गावडे, हेमलता भोसलॆ, माया खरुजकर, पी. डी. पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment