पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडीतील जवान शहीद - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2020

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडीतील जवान शहीद

ऋषिकेश रामचंद्र जोंधळे
कागणी : सी. एल. वृत्तसेवा

        दिवाळीच्या तोंडावर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मू-काश्मीरमध्ये विविध ठिकाणी गोळीबार करण्यात आला. यामध्ये गडहिंग्लज शहरापासून सहा किलोमीटर असलेल्या बहिरेवाडी (ता. आजरा) येथील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे (वय 20) हे जवान शहीद झाले. ऋषिकेश यांची पहिलीच पोस्टिंग जम्मू येथे झाली होती. 11 जून 1920 रोजी सुट्टी संपवून जम्मू येथे हजर झाले होते. 2018 ला कोल्हापूर बीआरओ 6 मराठा मध्ये भरती झाले होते. त्यानंतर बेळगाव मध्ये मराठा लाईट इन्फंट्री सेंटर मध्ये नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील एक लहान बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

                                                                      बातमीदार - संदिप तारिहाळकर, कागणीNo comments:

Post a Comment