अखेर आज माध्यमिक शाळांची घंटा खणखणली, शाळा झाल्या अनलॉक, विद्यार्थी वर्ग आनंदी - चंदगड लाईव्ह न्युज

23 November 2020

अखेर आज माध्यमिक शाळांची घंटा खणखणली, शाळा झाल्या अनलॉक, विद्यार्थी वर्ग आनंदी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आज अनलॉक झाल्याने श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे असे विद्यार्थ्यांचे स्क्रिनिंग करून प्रवेश देण्यात आला.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      कोविड १९ मुळे बंद असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची घंटा आज खणखणली. गेल्या अनेक दिवसापासून लॉक असलेल्या शाळा आज अनलॉक झाल्याने  विद्यार्थ्यांनी  आनंदाने कोविड नियमांचे पालन करत  प्रत्यक्ष अध्ययनाचा अनुभव घेतला.
शाळेत आलेल्या विद्यार्थ्यींनींची आॅक्सीजन तपासणी करताना शिक्षकवर्ग.
   कोविड मुळे सर्वच शाळा लॉक झाल्या होत्या. लॉक झालेल्या शाळा अनलॉक करण्याच्या प्रयत्न शासन व शिक्षण विभागाकडून चालू होता. पण कोरोनाचा वाढता फैलाव पाहून शाळा लॉकच ठेवून ऑनलाईन अध्यापनाचा पर्याय निवडण्यात आला होता. प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत सर्वच शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन अध्यापनावर भर दिला. पण आज दि २३ रोजी ज्या शाळेतील शिक्षकांची कोविड चाचणी पूर्ण झाली आहे . अशा २२ जिल्हयातील  माध्यमिक व उच्च माध्यमिक  शाळांचे इयत्ता ९वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग अनलॉक झाले. विद्यार्थी पालकांच्या संमतीने आज शाळेत दाखल झाले. शाळांनीही या अगोदरच पूर्व तयारी केली होती. आज शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थी वर्गासह शिक्षकांचीही थर्मल गनने व ऑक्सिमिटर स्क्रिनिंग करूनच शाळेत प्रवेश देण्यात आला. मास्कची सक्ती, प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र बेंच देण्यात आला असून कोविडच्या सर्व नियमांचे पालन करत शाळेची सुरवात करण्यात आली. आज ग्रामिण भागात  विद्यार्थी वर्गाचा समिश्र प्रतिसाद मिळाला आहे. शिक्षकांनीही पहिल्याच दिवशी थेट अध्यापनाला सुरवात केली. एकंदरीत शाळा सध्या तरी अन लॉक झाल्या असल्या तरी कोरोणाचा धोका टळलेला नाही. सर्वांनी काळजी घेणे महत्वाचे आहे अन्यथा पून्हा शाळा लॉक होऊ शकतात.

No comments:

Post a Comment