अस्वलाच्या हल्ल्यात जेलुगडे मधील वृद्ध गंभीर जखमी, पुढील उपचारासाठी पाठवले गडहिंग्लजला, वनविभागाकडून दहा हजारांची तातडीची मदत - चंदगड लाईव्ह न्युज

23 November 2020

अस्वलाच्या हल्ल्यात जेलुगडे मधील वृद्ध गंभीर जखमी, पुढील उपचारासाठी पाठवले गडहिंग्लजला, वनविभागाकडून दहा हजारांची तातडीची मदत

पुंडलिक जकनू गावडे 
चंदगड / प्रतिनिधी 

      अस्वलाच्या हल्ल्यात जेलुगडे मधील वृद्ध गंभीर जखमी  गावातील पुंडलिक जकनू गावडे (वय - 63) हे गुरे चरविण्यासाठी जंगलानजीक मानी नावाच्या शेतात गेले असता, अचानक अस्वलाने हल्ला केला. अस्वल हे पिल्ला सोबत असल्याने सायंकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली. यामध्ये त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. उजव्या पायात नखे, दाताने चावा घेऊन व ओरबडून जखमी केले. श्री. गावडे यांनी मोठमोठ्याने ओरडून प्रतिकार केल्याने त्यांची अस्वलांकडून सुटका झाली. त्यांना ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे प्रथम उपचार करण्यात आला व पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील हत्तरकी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

संग्रहित छायाचित्र

      वन विभागाचे वतीने वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी त्यांना दहा हजार रुपयाची तातडीची मदत दिली आहे. गुराखी व जंगलानजीक शेती असलेल्या ग्रामस्थांनी शेताकडे जाताना सावधानी बाळगावी. तसेच वनक्षेत्रात जाऊ नये असे आवाहन वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी केले आहे. घटनास्थळी वनपाल बि. आर. भांडकोळी, वनरक्षक एस. एस. पाटील, जी. एस. बोगरे, सदाशिव तांबेकर, एम. आय. सनदी व वनसेवक चंद्रकांत बांदेकर, विश्वनाथ नार्वेकर यांनी भेट देवून पाहणी केली. 



No comments:

Post a Comment