शिवनगे येथील निवृत्त ऑननरी कॅप्टन जक्काप्पा पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2020

शिवनगे येथील निवृत्त ऑननरी कॅप्टन जक्काप्पा पाटील यांचे निधन

जक्काप्पा पाटील

कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

         मुळचे शिवणगे (ता. चंदगड) व सध्या हिंडलगा, लक्ष्मीनगर येथील रहिवासी, भारतीय सैन्य दलाचे निवृत्त ऑननरी कॅप्टन  जक्काप्पा  जोतिबा पाटील (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी पहाटे बेळगाव येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दौलत साखर कारखान्याचे निवृत्त फिल्डमन व पोल्ट्री व्यावसायिक अमृत पाटील यांचे ते भाऊ होते. भारतीय सैन्य दलाचे नायब सुभेदार सचिन पाटील व एचडीएफसी बँकेचे पुणे येथील असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (एव्हीपी) संदीप पाटील यांचे ते वडील होत.  जक्काप्पा पाटील यांचा 1965 च्या  भारत-पाकिस्तान  युद्धात तसेच 1987 ते 1989 यादरम्यान श्रीलंका शांती सेनेमध्ये  सहभाग होता.   1962 च्या भारत-चीन युद्धातही त्यांचा सहभाग होता.No comments:

Post a Comment