तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा
शासनाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हयात इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग चालू झाले आहे आहेत. तत्पूर्वी या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. यामध्ये आतापर्यंत ५८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
यामध्ये सर्वाधीक शिक्षक करवीर व चंदगड तालूक्यातील आहेत. दि. २३ नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग चालू झाले. यापूर्वी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली. यामध्ये पुढीलप्रमाणे अहवाल पॉझिटीव्ह आले.
तालुकानिहाय आकडेवारी
१ ) करवीर -१९
२ ) चंदगड -१०
३ ) आजरा -१
४ ) भुदरगड -२
५ ) गडहिंग्लज -१
६ ) कागल -१
७ ) राधानगरी -७
८ ) शाहूवाडी -३
९ ) हातकणंगले -३
१ 0 ) शिरोळ -४
११ ) कोल्हापूर शहर -५
१२ ) पन्हाळा - ००
१३ ) गगनबावडा -००
No comments:
Post a Comment