करंजगाव येथे 2 लाख 18 हजारांची गोवा बनावटीची दारु जप्त, एकास अटक, चंदगड पोलिसांची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2020

करंजगाव येथे 2 लाख 18 हजारांची गोवा बनावटीची दारु जप्त, एकास अटक, चंदगड पोलिसांची कारवाई

चंदगड / प्रतिनिधी

        करंजगाव (ता. चंदगड) येथे चंदगड पोलिसांनी कारवाई करुन 2 लाख 18 हजार 784 रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली. या प्रकरणी संशयित करंजगाव येथील मारुती आवडण यांना चंदगड पोलिसांनी अटक केली आहे. आज (ता. 26) सकाळी आठ वाजता ही घटना घडली. पो. कॉ. वैभव गवळी यांनी याबाबतची फिर्याद चंदगड पोलिसात दिली आहे. 

          यासंदर्भात पोलिसांतून मिळालेली माहीती अशी – संशयित मारुती आवडण यांनी गोवा बनावटीच्या दारुचा साठा करंजगाव गावच्या बाजुस असलेल्या जनावारांच्या गोठ्यातील भिंतीच्या आडोशा ्रगत केला होता . याबाबत चंदगड  पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी आठच्या दरम्यान पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी गोल्डन आईस व्हीस्की कंपनीचे ३४ बॉक्स (१ लाख ८२ हजार ७८४ किमत), गोल्डन आईस व्हीस्कीचे ५ बॉक्स (२७ हजार किमत), रियल्स थरटी ट्रॅव्हलर व्हिस्कीचा १ बॉक्स  (९ हजार रुपये किंमत) असे एकूण २ लाख १८ हजार ७८४ किमतीची गोवा बनावटीची दारु जप्त केली. संशयिताने बेकायदा व विनापरवाना गोवा बनावटीची दारु महाराष्ट्र राज्याचा कर चुकवून बेकायदेशीरपणे साठा केला होता. पोलिसांनी मारलेल्या छाप्यामध्ये साठवणुक केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संशयिताला चंदगड पोलिसांनी अटक केली आहे. गडहिंगलजचे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, चंदगडचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुतार, पोलीस नाईक किल्लेदार, पोलीस कॉन्स्टेबल व्ही. एस. गवळी, पोलीस कॉन्स्टेबल सुतार यांनी सदर कारवाई केली. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पोलिस नाईक व्ही. बी. सुतार तपास करत आहेत.



No comments:

Post a Comment