पदवीधर व शिक्षकांना न्याय देण्यासाठी साथ द्या - राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2020

पदवीधर व शिक्षकांना न्याय देण्यासाठी साथ द्या - राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील

शिनोळी (ता. चंदगड) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलताना जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील. सोबत आमदार राजेश पाटील, भिकू गावडे आदी. 

तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा

           गेल्या अनेक वर्षांपासून पदविधरांना नोकऱ्या नाहीत तर शिक्षकांचे हजारो प्रश्न प्रलंबीत आहेत. या सर्वाना न्याय द्यायचा असेल तर चंदगड विधानसभा मतदार क्षेत्रातील सर्व मतदारानी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या असे आवाहन कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यानी केले.

         शिनोळी (ता. चंदगड) येथे चंदगडचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चंदगड तालूक्यातील राष्ट्रवादीच्या नूतन कार्यकारीणीचा सत्कार समारंभ व राष्ट्रवादीच्या मेळावा प्रसंगी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील बोलत होते. यावेळी पूणे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर आपल्या प्रचारार्थ  उपस्थित होते.

      प्रास्ताविक नगरसेवक शिवानंद हुंबरवाडी यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षाच्या नुतन कार्यकारीनीचा सत्कार करण्यात आला. याबरोबर चंदगड तालूका राष्ट्रवादी अध्यक्षपदी भिकू गावडे, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबदद्ल अभय देसाई, संचालक बाळू चौगुले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रविण वाटंगी आदिंचा सत्कार करण्यात आला.

       यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील म्हणाले , मतदारसंघातील सर्व पदाधिकारी निवडी  पूर्ण झाल्या असल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. सरकारच्या सहकार्याने मतदार संघाच्या विकास करणे हेच एक ध्येय आहे. यासाठी कार्यकर्त्यानी महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन करून मतदार संघातीत सर्व मतदार आघाडीच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. तसेच कोरोणापासून स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन उपस्थिताना केले .

     यावेळी  पुणे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार अरूण लाड यांचे प्रतिनिधी प्रा. राहूल कुंभार, प्रा. आर. एस. देसाई, वसंत जोशिलकर, संगीता पाटील, प्राचार्य वाय. व्ही. कांबळे, भिकू गावडे, यासिन मुजावर, माणीकराव  साळोखे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला  जि. प. सदस्य अरून सुतार, विनोद पाटील, अली मुल्ला, अशोक देसाई, तानाजी गडकरी आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुंडू शिवनगेकर यांनी केले तर आभार बी. बी. नाईक यांनी मानले.

No comments:

Post a Comment