महाराष्ट्रातील माध्यमिक शाळा झाल्या सॅनिटाइझ, तब्बल नऊ महिन्यानी वाजणार शाळांच्या घंटा - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2020

महाराष्ट्रातील माध्यमिक शाळा झाल्या सॅनिटाइझ, तब्बल नऊ महिन्यानी वाजणार शाळांच्या घंटा

महाराष्ट्रात शाळा सूरू होत असल्याने शालेय वर्ग सॅनिटाईझ करताना अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूलचे कर्मचारी.


तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा 

          कोरोणामुळे २३ मार्चपासून बंद असलेल्या महाराष्ट्रातील शाळा २३ नोव्हेंबर रोजी चालू  होत असल्याने सर्वच शाळानी जय्यत तयारी केली आहे . संपूर्ण शाळा सॅनिटाइझ केल्या असून तब्बल नऊ महिन्यानी शाळांची घंटा खणखणणार आहे.

          कोरोनामुळे मार्च महिण्याच्या २३ तारखेनंतर सर्वच शाळा बंद करण्यात आल्या . यानंतर तीन वेळा शिक्षण विभागाने शाळा चालू करण्याच्या तारखा जाहिर केल्या . पण कोरोणाग्रस्थांची संख्या वाढत गेल्याने शिक्षण विभागाला निर्णय बदलावा लागला . अखेर उदया सोमवार दि .२३ नोव्हेंबर रोजी मुंबई व पुणे शहर वगळता तसेच स्थानिक प्रशासनाचा विचार घेऊन इयत्ता ९वी ते १२ पर्यंतचे वर्ग चालू होत आहेत . यामुळे स्थानिक प्रशासन , शाळा व्यवस्थापन कमिटी , ग्राम पंचायत यांच्या कडून सर्व शाळा सॅनिटाईझ करण्यात आल्या आहेत . तसेच शाळेत येणाऱ्या सर्वांची रोज थर्मल स्कॅनिंग , ऑक्सिमिटर तपासणी व  कोविड १९ च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे . या वर्गाना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांची कोरोणा चाचणीचे घेण्यात येत आहे . सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू होत असल्या तरी अजून धोका टळलेला नाही . त्यामुळे पालक , विद्यार्थी व शिक्षक यानी काळजी घेणे गरजेचे आहे . सध्या मात्र शाळांच्या घंटा खणखणणार असून विद्यार्थी कितपत शाळामध्ये अपस्थित राहणार ? हे या  आठवडयात समजणार आहे.

No comments:

Post a Comment