प्रासंगिक..........कोण पूसेल शेतकऱ्यांचे अश्रु? - चंदगड लाईव्ह न्युज

21 December 2020

प्रासंगिक..........कोण पूसेल शेतकऱ्यांचे अश्रु?

                                                                   विनया गावडे

              आपला भारत देश हा जगामध्ये कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आज A1 अधिकारी खुर्चीवर बसून आरामात खाऊ- पिवू शकतो. पण, जो रात्रभर शेतात बसून घाम गाळतो त्यांबद्दल आपण कधी विचार केलाय का? आज तो काय करतोय? कोल्हापूर जिल्ह्याचे अगदी शेवटचे टोक म्हणजे चंदगड तालुका, निसर्गाने अलंकारबद्ध झालेले असे ठिकाण. जरी औद्योगिक क्षेत्रात इतकी मजल मारली नसली तरी शेतीक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. पण तरीही तो शेतकरी राजा समाधानी नाही. तो जरी राजा असला तरीही तो आज लाचार झालाय. याच कारण काय? जंगली श्वापदे.....! 

          आज चंदगड पासून 15 किलोमीटरवर असलेले, तालुक्याचं शेवटचं टोक, जवळजवळ 750 लोकसंख्या असलेलं निसर्गाचं वरदान लाभलेल जांबरे हे गाव, पण ते नक्की वरदान आहे की शाप हेच कळत नाही. डोंगरदऱ्यांच्या पायथ्याशी लोकांची शेती असल्यामुळे जंगली प्राण्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हत्ती, गवे अशा रानटी प्राण्यांनी दिवसाढवळ्या शेतात धुमाकूळ घातलाय. गावात शेतिव्यातिरिक्त उत्पन्नाचं दुसर साधन नाही. शिवपूर्वकाळात मोगल, निजाम शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात नाचत होते.आणि आज पुन्हा तीच परिस्थिती पाहायला भेटते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला जातोय. कर्ज काढून शेती करायची, आणि सरळ जनावरांच्या घशात घालायचं .. ! याला जबाबदार कोण? सरकार दरबारी न्याय मागायचा झाला तर सरकार नुकसान भरपाई देईल का? आणि जरी सरकारने निवेदन मंजूर केलं तरीही मुख्यतः ती भरपाई पदरात कधी पडणार? खरचं जंगली प्राण्यांपासून होणार शेतकऱ्यांच नुकसान ही खूप मोठी समस्या बनली आहे. शेताचा पंचनामा करून झाल्यावर सरकार नुकसान भरपाई देत. ही गोष्ट मान्य आहे, पण जितकी नुकसान भरपाई असते त्याच्या दुप्पट खर्च हा शासनदरबारी कागदपत्रं जमा करताना होत.  

              बळीराजाचा खुपमोठ्या प्रमानात शेतसारा जमा होतो, पण शेतकऱ्याला शासनाकडून म्हणावी तशी मदत मिळत नाही. शेतकऱ्यांच्या सर्वच कामात अधिकारी लोक टेबलाखालून चिरीमिरी घेतल्याशिवाय काम करत नाहीत. गिधाडाप्रमाने शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर टपुन बसलेली असतात. त्याला ओरबाडून त्याची तक्तरे करत नाहीत, तोपर्यंत ते गिधाड शांत बसत नाही. आत्ता बळीराजा हताश, उदास होऊन डोळेझाकुन निपचीप पडला आहे. त्याला गरज आहे ती एका अशा व्यक्तीची जी दुसऱ्याच दुःख हे आपल दुःख आहे असे समजून, त्याला न्याय मिळवून देणारी. आणि जेव्हा दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती जन्माला येईल तेव्हा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील महसत्ताक भारत बनायला वेळ लागणार नाही ...!

                                                               -  विनया गावडे

1 comment:

Post a Comment