कागणीच्या ४० तरुणांनी केले रक्तदान, रक्तसंक्रमण परिषदेला प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

21 December 2020

कागणीच्या ४० तरुणांनी केले रक्तदान, रक्तसंक्रमण परिषदेला प्रतिसाद

 
  
                               कागणी : रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संभाजीराव देसाई - शिरोलीकर, जनार्दन  
                               देसाई, अशोक भोगण,  सर्जेराव बाचुळकर, श्रीधर देसाई आदी.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

    राज्य सरकारच्या मुंबई येथील राज्य रक्तसंक्रमण परिषदेने रक्तदानासाठी विविध संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत कागणी (ता. चंदगड) येथील ४० तरुणांनी एकत्र येत रविवार दिनांक 20 रोजी रक्तदान केले. माजी उपसरपंच जनार्दन देसाई,    अशोक भोगण, शाही फुड्सचे संचालक व उद्योजक श्रीधर देसाई, चंद्रसेन देसाई यांनी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधून रक्त दान शिबीर आयोजित करावे, अशी विनंती केली. त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील ब्लड बँकला सूचना करून रक्त संकलन करण्यास सांगितले. शिबीर भरवण्यासाठी सर्जेराव बाचुळकर, बापू राजगोळकर,  विनोद कुद्नुरकर, प्रवीण खाडे, धनाजी जांभळे, अभिजीत देसाई, श्रीनाथ देसाई, हेमरसचे फिल्ड ऑफिसर संजय देसाई, रोहित देसाई, गौरव देसाई, प्रसाद देसाई, सूरज देसाई, अजित खाडे, यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान चंदगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई- शिरोलीकर यांनीही भेट देऊन या उपक्रमाबद्दल तरुणांचे कौतुक केले.कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील ब्लड बँकेने रक्त संकलन केले.

No comments:

Post a Comment