नेसरी येथे सरसेनापती प्रतापराव गुर्जरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण, नेसरीच्या वैभवात भर - चंदगड लाईव्ह न्युज

21 December 2020

नेसरी येथे सरसेनापती प्रतापराव गुर्जरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण, नेसरीच्या वैभवात भर

                     नेसरी येथील सेनापती प्रतापराव गुर्जरांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्यात.

नेसरी / प्रतिनिधी    
       नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जरांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती चिऱ्यांची सुंदर व आकर्षक अशी तटबंदी उभारल्याने पुतळ्याबरोबरच नेसरीच्या सौंदर्यात भर पडली आहे. अजून काही काम बाकी असले तरी या तटबंदीकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.
शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यानी बहलोल खानास जीवनदान दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अतीशय कडव्या शद्वात गुर्जरा ना पत्र पाठवले. या पत्रातील मजकूर गुजराच्या जिव्हारी लागल्याने प्रतापरांवानी आपल्या साथीदांरासह बहलोल खानच्या सैन्यांवर चाल केली होती. नेसरी खिंडीत झालेल्या घणघोर लढाईत या सात विरांना विरमरण प्राप्त झाले होते. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण व्हावे, यासाठी नेसरी-कानडेवाडी येथे भव्य स्मारक बांधण्यात आले आहे. तर नेसरीच्या बसस्थानकांवर भव्य असा सेनापती प्रतापराव गुर्जरांचा आश्वारूढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याभोवती अगोदर लोखंडी ग्रील बसविण्यात आले होते. पण ते गंजून जीर्ण झाल्याने बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार नेसरी गामपंचायतीने तंटामुक्त पुरस्कार व अन्य रकमांचा वापर करून सुंदर अशी चिऱ्यांची तटबंदी उभारण्यात आली आहे. त्याबरोबरच पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिडिही बसविण्यात येणार आहे. तसेच हाय मॉस्क विद्युत दिवेही बसवण्यात येणार आहेत. एकंदरीत या सुशोभिकरणामुळे नेसरी बसस्थानक उजाळून मिघणार आहे. याचा लाभ पर्यटकांना होणार आहे.

No comments:

Post a Comment