कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
किटवाड ता. चंदगड येथील नंबर-१ धरणातील झिगझॅग भिंतीलगत बुडालेल्या बेळगाव च्या तरुणाचा शोध घेण्याची मोहीम दुसऱ्या दिवशीही निष्फळ ठरली.
काल रविवार दि. २० रोजी दुपारी २.३० वाजता ही घटना घडली होती. तेव्हापासून आज सायंकाळपर्यंत रेस्क्यू फॉर्स चे जवान, चंदगड पोलीस व परिसरातील तरुण शोध घेत आहेत. अभिषेक सज्जन वय २४, रा. माळ मारुती, श्रीनगर एरिया, बेळगाव हा इंजिनीयर असून तो घरातील सदस्यां सोबत पिकनिक साठी किटवाड धबधबा व धरणा वर आला होता. काल दुपारी अडीच वाजता धरणातील जलाशयात हात पाय धुण्यासाठी गेला असता पाय घसरून पडला व पोहता न आल्याने बुडाला. मृतदेह शोधण्यासाठी अंधार पडेपर्यंत रेस्क्यू फोर्स च्या जवानांनी प्रयत्न केले पण यश आले नव्हते. आज सकाळपासून अंधार पडेपर्यंत पुन्हा शोध मोहीम राबवली पण यश आले नाही उद्या सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी बेळगाव रेल्वे स्टेशनचा एक कर्मचारी येथील धबधब्यात पडून मृत झाला होता. यंदाच्या वर्षातील ही दुसरी घटना ठरली. यामुळे किटवाड पर्यटन क्षेत्राची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.
No comments:
Post a Comment