किणी येथे भरणारी झुटिंग बाबाची यात्रा रद्द, भाविकांनी यात्रेला न येण्याचे ग्रामस्थांकडून आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2020

किणी येथे भरणारी झुटिंग बाबाची यात्रा रद्द, भाविकांनी यात्रेला न येण्याचे ग्रामस्थांकडून आवाहन

                                         किणी (ता. चंदगड) येथील झुटिंग बाबा देवस्थान

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

           कर्यात भागाबरोबरच तालुक्यातील भक्तांचे श्रद्धस्थान असलेले किणी येथील झुटिंग बाबा देवस्थान.दर वर्षी डिसेंम्बर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भरणाऱ्या यात्रेला हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येऊन नतमस्तक होत असतात परंतु यंदा कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन खबरदारी म्हणून १ जानेवारी ला होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय किणी ग्रामस्थ, ग्रामपंचायत कमिटी आणि देवस्थान हक्कदार समिती मार्फत घेण्यात आला असून यंदा यात्रेला न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment