निवडणुक ग्रामपंचायतीची : ऑनलाईन एवजी आता ऑफलाईन अर्ज भरण्याचा आदेश, वेळही वाढवली - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2020

निवडणुक ग्रामपंचायतीची : ऑनलाईन एवजी आता ऑफलाईन अर्ज भरण्याचा आदेश, वेळही वाढवली

                    

चंदगड / प्रतिनिधी

        संगणक प्रणालीतील तांत्रिक अडचणी, इंटरनेट स्लो होणे, सर्व्हर डाऊन होणे यासारख्या अडचणी येत असल्याने अखेर आयोगाने अर्ज भरण्यासाठीची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ३० डिसेंबरपर्यंत अर्ज भरणाऱ्यांना सायंकाळी साडे पाचपर्यंत अर्ज भरून स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे होत असलेल्या विलंबातून इच्छुक उमेदवारांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

        गेल्या दोन दिवसांपासून तांत्रिक कारणामुळे अनेक उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन भरण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत इच्छुकांना ताटकळत उभे राहण्याची वेळ आली होती.

   डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या सुमारे 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची कालावधी दिनांक 23 डिसेंबर 2020 ते दिनांक 30 डिसेंबर 2020 अशी  होती. या  कालावधीत संगणक प्रणालीद्वारे एकूण 3 लाख 32 हजार 844 नामनिर्देशनपत्र दाखल झाले. पण 28 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी जसे इंटरनेट, सर्व्हर डाउन या समस्या येत असल्याचा तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या. 

        सदर बाब विचारात घेता इच्छुक उमेदवार नामनिर्देशन पत्रापासून वंचित राहू नये, त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळावी यासाठी आयोगाने नामनिर्देशन पत्र पारंपारिक पद्धतीने स्वीकारण्याची व नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ देखील दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी साडे पाचपर्यंत वाढवण्यात आली आहे.No comments:

Post a Comment