चंदगड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागला आहे. त्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा चौथा दिवस आहे. आजअखेर 508 व्यक्तींनी 518 अर्ज भरले आहेत. उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वांधिक अर्ज उद्या (ता. 29) रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. घुल्लेवाडी, केरवडे, कानडी, म्हाळेवाडी या चार गावांतून अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी गडबड केली जाणार आहे.
कालपासून ग्रामपंचायतीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वापरण्यात येणारा सर्व्हर संथ सुरु होता. आज दुपारी तो बंद पडला. त्यामुळे अनेक इच्छुकांनी चिंतेत भर पडली. मात्र सायंकाळी पाचच्या दरम्यान निवडणुक विभागाने सर्व्हर बंद पडल्यामुळे ऑनलाईन एवजी ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा आदेश काढला. त्यामुळे अनेक इच्छुकांना जीव भांड्यात पडला.
गावनिहाय आतापर्यंत दाखल झालेले अर्ज, कंसात आतापर्यंतची संख्या - दाटे (17), तुडये (39), हलकर्णी (9), कालकुंद्री (11), कोवाड (29), बसर्गे (31), धुमडेवाडी (4), बोजुर्डी (10), मुगळी (6), ढोलगरवाडी (7), मांडेदुर्ग (8), मलतवाडी (6), दिंडलकोप (13), राजगोळी बुद्रुक (30), करेकुंडी (8), बुक्कीहाळ (6), कळसगादे (17), पाटणे (16), इब्राहिमपूर (10), हजगोळी (27), माडवळे (15), जांबरे (7), नागवे (11), कौलगे (19), होसुर (14), शिनोळी खुर्द (45), सुरुते (21), तावरेवाडी (7), बागिलगे (11), नांदवडे (16), आसगाव (1), सुंडी (1), देवरवाडी (20), किणी (7), चिंचणे (1), पुंद्रा (14), किटवाड (4) असे 35 गावातून 508 व्यक्तींनी 518 अर्ज आतापर्यंत भरले आहेत.
तारीखनिहाय अर्ज दाखल व्यक्ती व संख्या -
23 डिसेंबर 2020 00
24 डिसेंबर 2020 रोजी 16 व्यक्ती 17 अर्ज
28 डिसेंबर 2020 रोजी 159 व्यक्ती 163
29 डिसेंबर 2020 रोजी 333 व्यक्ती 338
एकूण 508 व्यक्तींनी 518 अर्ज आजअखेर दाखल झाले आहेत.
No comments:
Post a Comment