कुलदैवत संस्थेमार्फत लाभांश वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2020

कुलदैवत संस्थेमार्फत लाभांश वाटप

 

चंदगड / प्रतिनिधी
     धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील  कुलदैवत विकास सेवा संस्थेमार्फत सभासदांना ८ टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात आले. कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला थोडीफार मदत व्हावी, या उद्देशाने त्वरीत निर्णय घेऊन सभासदांना ८ टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात आला. सभासदांच्या ठेवीवर ७ टक्के प्रमाणे व्याज परतावा, असे एकूण ३ लाख ८६ हजार ९ ४७ रुपये इतकी रक्कम वाटप केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन आर. जी. पाटील यांनी दिल्याने सभासदातून समाधान व्यक्त होत आहे.


No comments:

Post a Comment